बेळगाव : मागील वर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव शहरातील अनगोळ येथे भव्य बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे. या शर्यतीसाठी लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
गुरुवारी 17 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत श्री मरगाई मंदिर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव अनगोळ येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैलगाडी शर्यतीसाठी लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून बेळगाव हिंदकेसरी 2025 हा मानाचा किताब देण्यात येणार आहे.
खुल्या गटातील विजेत्या बैलजोडीला 2 दोन लाख रुपये तर लहान गटातील विजेत्याला एक लाख रुपयांचे बक्षीस आणि हिंदकेसरी 2025 हा किताब दिला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ विभागाच्या वतीने या जंगी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
हौशी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील इच्छुकांनी माहितीसाठी उमेश कुऱ्याळकर, मनोज चावरे आणि श्याम गोंडाडकर दूरध्वनी क्रमांक 9740018375, 9448065333 आणि 9945929200 यांच्याशी संपर्क असे आवाहन करण्यात आले आहे.