बेळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बेळगाव येथील शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी कडोली गावातून निघालेली डॉल्बी साऊंड सिस्टीमची ट्रॉली अगसगाजवळ उलटून दोन तरुण जखमी झाले आहेत.
या अपघातात कडोली येथील भरत संभाजी कांबळे (२२) आणि रोहिल मॅगेरी (२८) हे दोघे जखमी झाले असून त्यांना तातडीने बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भरत गंभीर जखमी झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डॉल्बीची ट्रॉली आंब्याच्या झाडावर आदळली आणि पलटी झाली. ट्रॉली पडताच स्थानिकांनी बिनदिक्कतपणे दोघांनाही वाचवले आणि तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले.
घटनेची माहिती मिळताच काकती पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.