Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगावात आणखी एका तरुणीची आत्महत्या

Spread the love

 

बेळगाव : मुस्लिम तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून बीसीएच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना बेळगावात घडली आहे. शिल्पा (22) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. हावेरी जिल्ह्यातील शिगावी येथील शिल्पा ही तरुणी बेळगावमध्ये बीसीएचे शिक्षण घेत होती. तिने आपण रहात असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

शिल्पाचे हावेरी जिल्ह्यातील शिगावी येथील एका फर्निचरच्या दुकानात काम करणाऱ्या नवीन नावाच्या तरुणावर तीन वर्षांपासून प्रेम होते. नवीन ज्या दुकानात काम करतो त्या दुकानाचा मालक असलेल्या रमजान नदाफ हा शिल्पाला सतत फोन करून त्रास देत होता. यामुळे नाराज झालेल्या शिल्पाने बेळगाव येथे रहात असलेल्या खालीत गळफास घेतल्याचा आरोप आहे. सदर घटना गेल्या आठवड्यात घडली असून घटना उशिरा समोर आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *