बेळगाव (प्रतिनिधी) : येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या गणपती गल्लीतील श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटीतर्फे मंगळवार दि. ८ मार्च रोजी सायंकाळी ठिक ४ वा. जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गजाननराव भातकांडे इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा खन्नूकर उपस्थित राहणार आहेत. गणपत गल्ली येथील सोसायटीच्या प्रधान कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी सामाजिक कार्यात कार्यरत असलेल्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेतील होतकरु महिलांचा सन्मान व संस्थेच्या सभासदांच्या गुणी मुलांचाही सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास सुवर्णलक्ष्मी सोसायटीच्या सर्व सभासदांनी आणि समाज बंधु-भगिनींनी उपस्थित रहावे, असे आवाहन व्हा. चेअरमन विजय सांबरेकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta