Monday , September 21 2026
Breaking News

पालखी प्रदक्षिणाने बाबा महाराज पुण्यतिथी सोहळ्याची सांगता

Spread the love

निपाणी (वार्ता) : येथील दर्गा संस्थापक संत बाबा महाराज चव्हाण पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. गेले आठ दिवस ज्ञानेश्वरी पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम पार पडले. शनिवारी शेवटच्या दिवशी दिंडी प्रदक्षिणा चव्हाणवाडा ते दत्त मंदिर, हरी मंदिर, थळोबा पेठ, विद्या मंदिर मैदान समाधी स्थळ तसेच दर्गा भेट व तेथून चव्हाणवाडा येथे आली. येथे आरती, प्रवचन, भजन होऊन मानाच्या जगाचे आगमन होऊन महाप्रसादने सांगता झाली.
यावेळी बाळासाहेब देसाई सरकार, संग्राम देसाई सरकार, रणजित देसाई सरकार, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, पप्पू चव्हाण, किरण कोकरे, धनाजी निर्मळे, दिलीप पठाडे, संजय पावले, संजय माने, जयंत दुधरकर, मिलिंद मेहता, शैलेंद्रे साळवे, संभाजी मुगळे, विश्वास माळी, शरद मळगे, सदाशिव डवरी, मच्छिंद्र डवरी, पिंटू हरेल, वैभव सांगावकर, महाजन महाराज, शिंदे महाराज, कदम महाराज, गजानन खापे, रमेश देसाई सरकार, नंदा देसाई सरकार, सरिता देसाई सरकार, सुजय देसाई सरकार, नम्रता देसाई सरकार, सुचिता शिदेसरकार, प्रविता जाधव यांच्यासह भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गजानन महाराज संजीवन समाधी मंदिरात ५६ प्रकारचा नैवेद्य

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील रोहिदासनगरमध्ये असलेल्या गजानन महाराज मंदिरात संत गजानन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *