बेळगाव : समाज माध्यमावर प्रतिक्रिया देऊन दोन भाषिकांत तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवून माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक जे.एम. कालिमिर्ची यांनी डी.सी.पी. रोहन जगदीश यांचेकडे शुभम शेळके यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव ठेवला होता. आज 21 एप्रिल रोजी त्याची सुनावणी पोलीस उपायुक्त कार्यालयात न्याय दंडाधिकारी म्हणून रोहन जगदीश यांच्या समोर पार पडली, शुभम शेळके यांनी वकील महेश बिर्जे यांच्यासह हजेरी लावली होती. डीसीपी यांनी पुढील सुनावणी तारीख 7 मे रोजी निश्चित केली आहे.
या सुनावनीवेळी ऍड.वैभव कुट्रे, ऍड.रिचमन रिकी, ऍड.अश्वजित चौधरी, धनंजय पाटील, मनोहर हुंदरे, प्रविण रेडेकर, अशोक घगवे, विजय जाधव, किशोर मराठे, वैभव मराठे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta