Monday , September 21 2026
Breaking News

पत्नीला व्हॉट्सॲप मॅसेज पाठवल्याबद्दल विचारणा केल्यामुळे ऑटोचालकावर प्राणघातक हल्ला

Spread the love

 

बेळगाव : पत्नीला मोबाईलवर मॅसेज पाठवल्याबद्दल विचारणा केल्याने 20 ते 25 तरुणांच्या टोळक्याने ऑटोचालकावर लाठ्याकाठ्या व प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना संगोळी रायण्णा सर्कल येथे घडली.
या हल्ल्यात ऑटोचालक वसीम बेपारी हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
येथील वीरभद्रेश्वर नगर येथील एका व्यक्तीने वसीम बेपारी यांच्या पत्नीला व्हॉट्सॲप मॅसेज पाठवला. वसीम यांनी सदर व्यक्तीला मॅसेज पाठवल्याबद्दल जाब विचारला असता सदर व्यक्तीने 20-25 तरुणांच्या टोळक्याला घेऊन संगोळी रायण्णा सर्कलजवळ एका हॉटेलमध्ये बसलेल्या वसीमवर चाकूसह प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला हल्ल्यानंतर त्यातील दोन आरोपी मार्केट पोलिस स्टेशनमध्ये जाऊन बसले, अशी माहिती हल्ला झालेल्या ऑटोचालकाचा भाऊ सलीम बेपारी याने प्रसारमाध्यमांसमोर दिली. ही घटना मार्केट पोलीस स्टेशन हद्दीत घडली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *