Saturday , December 13 2025
Breaking News

बैलूरच्या ममता झांजरे कलाश्री सोसायटीच्या लकी ड्रॉच्या 10 ग्रॅम सोन्याच्या मानकरी

Spread the love

 

कलाश्री उद्योग समुहाच्या ड्रॉ मध्ये शाहुनगरच्या दिपा कणबरकर 43 इंच कलर टीव्हीच्या विजेत्या

बेळगाव : उद्यमबाग येथील कलाश्री सोसायटी व उद्योग समुह आयोजित एफ डी ठेव लकी ड्रॉ मध्ये बैलुरच्या ममता झांजरे भाग्यवान विजेत्या ठरल्या त्यांना 10 ग्रॅम सोने मिळाले तर उद्योग समुहाच्या सोळावा बंपर ड्रॉ मध्ये शाहुनगरच्या दिपा कणबरकर भाग्यवान ठरल्या त्यांना 43 इंची LED कलर टीव्ही मिळाल्या .
समुहाचे अध्यक्ष प्रकाश डोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमांत प्रारंभी प्रमुख पाहुणे श्री. प्रकाश अष्टेकर (चेअरमन नवहिंद को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी) श्री. अनिल हुंदरे व्हा. चेअरमन नवहिंद को -ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी) श्री. लक्ष्मण झांजरे (चेअरमन हनुमान सोसायटी बैल्लूर) श्री. व्ही. पी. डिचोलकर (चेअरमन हनुमान सोसायटी ओलमनी), संगीत गुरुवर्य शंकर लक्ष्मण पाटील, श्री. अतुल शिरोले (नॅशलन कुस्ती चॅम्पियन) या मान्यवरांनी दिप प्रज्वलन केले. त्यानंतर कलाश्री ग्रुपचे चेअरमन श्री. प्रकाश डोळेकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली व प्रथम उद्योग समुह ड्रॉ काढण्यात आला. त्यामध्ये पाहिले बंपर 43 इंची LED टीव्हीच्या मानकरी दीपा सुनील कणबरकर ठरल्या तर चार उपविजेते प्रियंका पी. खानापुरे (कागणी कालकुंद्री चंदगड महाराष्ट्र), ओवी अमोल पाटील (शिवशक्ती नगर अनगोळ), श्री. मल्लाप्पा शिवाजी काकतकर (मन्नूर), श्री. महादेव लक्ष्मण गडकरी (हिंडलगा) हे भाग्यवान ठरले. त्यांना टी केटर बक्षिसा दाखल देण्यात आले. त्यानंतर कलाश्री को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडतर्फे वर्धापना निमित्त एफ.डी. ठेवलेल्या सभासदांचा ड्रॉ काढण्यात आला त्यामध्ये पुढीलप्रमाणे भाग्यवान विजेते ठरले 10 ग्रॅम सोन्याच्या विजेत्या ममता जोतिबा झांजरे (बैलूर), मुमताजबेगम बी. नदाफ टिपू सुलतान नगर मच्छे (500 ग्रॅम चांदी), सौ. निकिता माणिक निलजकर कंग्राळी के. एच. (43 इंची इलेस्ता LED टीव्ही), पुंडलिक भैरू पाटील वडगांव (कॉर्नर सोफा सेट), पृथ्वीराज काशीराम पाटील कंग्राळी के. एच. ( रोख ₹. 25000/-) सर्व विजेत्यांना बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. त्याच प्रमाणे वेळेत उपस्थित असणाऱ्या चार भाग्यवान ग्राहकांना भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले तर उपस्थित सर्वासाठी घरगुती वस्तू सवलतीने देण्यात आल्या. वाय. बी. पवार सर यांच्या ग्रुपचा या ठिकाणी 1 ते 4 या वेळेत वधुवर सूचक मेळावाही संपन्न झाला. कार्यक्रमांसाठी कलाश्रीचे सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्रमोद हनुमंत डोळेकर, संचालिका रश्मिता रवळनाथ यादव, संचालक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स राजीव हुनुले, संचालक इंजिनियर अक्षय जांगळे, संचालक कृष्णा रामलिंग पाटील, संचालक नागेश हट्टीकर, संचालक किरण होस्मनी, गोवा डीलर सारिका शंकर कित्तुरकर, डीलर सिद्धाप्पा तुकानाचे, प्रकाश बेळवटकर, पुंडलिक मजूकर, मार्केटिंग मॅनेजर पुंडलिक राज गोळकर, राजू मधु डोळेकर, श्रीनिवास पोळ, विजय पाटील, विष्णू मारुती डोळेकर, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते . सूत्रसंचालन पाखरे सर यांनी तर आभार टी. डी. पाटील यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

बी. के. मॉडेल हायस्कूलचा २० पासून शताब्दी सोहळा : अविनाश पोतदार

Spread the love  बेळगाव : सुमारे शंभर वर्षांपूर्वी, २ फेब्रुवारी १९२५ रोजी सात तरुण शिक्षकांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *