बेळगाव : कलम ३७० रद्द केल्यानंतरही काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा नंगानाच सुरूच आहे. या दहशतवादाला आळा घालण्यासाठी जम्मू – काश्मीर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून आतंकवाद्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यात यावा व २७ हिंदू पर्यटकांची हत्या केलेल्या दहशतवाद्यांना कठोर शासन करून मृत्यूदंड देण्यात यावा यासाठी श्रीराम सेना हिंदूस्थानच्यावतीने आज दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी राणी चन्नमा चौक, बेळगाव ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात येणार आहे. तरी हिंदुत्ववादी नागरिक व देशभक्तांनी सकाळी ठीक ११ वाजता राणी चन्नमा चौक येथे उपस्थित रहावे असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानकडून करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta