Monday , September 21 2026
Breaking News

काश्मीर हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन देणार

Spread the love

 

बेळगाव : कलम ३७० रद्द केल्यानंतरही काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा नंगानाच सुरूच आहे. या दहशतवादाला आळा घालण्यासाठी जम्मू – काश्मीर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून आतंकवाद्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यात यावा व २७ हिंदू पर्यटकांची हत्या केलेल्या दहशतवाद्यांना कठोर शासन करून मृत्यूदंड देण्यात यावा यासाठी श्रीराम सेना हिंदूस्थानच्यावतीने आज दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी राणी चन्नमा चौक, बेळगाव ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात येणार आहे. तरी हिंदुत्ववादी नागरिक व देशभक्तांनी सकाळी ठीक ११ वाजता राणी चन्नमा चौक येथे उपस्थित रहावे असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानकडून करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *