बेळगाव : इंडियन डेंटल असोसिएशन व समर्थ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ सोसायटी लक्ष्मी नगर, हिंडलगा येथे मोफत मौखिक आरोग्य जागृती व तपासणी करण्यात आली. मराठा मंडळ डेंटल कॉलेजच्या डॉक्टर सई चांदणी, डॉक्टर नितीन शर्मा, डॉक्टर नेत्रा सबनीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तमरीत्या मौखिक आरोग्य जागृती व तपासणी कार्य केले. महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ नीला पाटणेकर यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले. या कार्यासाठी मंडळाच्या भगिनींनी विशेष परिश्रम घेतले. समर्थ सोसायटी व लक्ष्मी नगर परिसरातील रहिवाशांनी या योजनेचा लाभ घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta