बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलने २६ एप्रिल २०२५ रोजी “पालक समुपदेशन सत्र” आयोजित केले होते. शालेय मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समुपदेशक अपूर्वा अभय गुडी यांच्या नेतृत्वाखाली हे सत्र यशस्वी झाले.
अपूर्वा गुडी या शालेय समुपदेशक आणि समुपदेशन मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे आणि विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी कार्य करतात.
या सत्रात पालकांनी सक्रिय सहभाग घेत मुलांच्या विकासासाठी उपयुक्त माहिती मिळवली. सत्रामुळे बालक, पालक आणि शिक्षक यांच्यातील समन्वय वाढला.
Belgaum Varta Belgaum Varta