Sunday , October 4 2026
Breaking News

पिरनवाडी भागात युवा समिती उपाध्यक्ष नारायण मुंचडीकर व मित्रपरिवार यांच्या सौजन्याने पाणी पुरवठा

Spread the love

 

बेळगाव : ऐन उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असते त्याच प्रमाणे पिरनवाडी येथे सुद्धा पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे त्यासाठी युवा समिती सिमाभागचे उपाध्यक्ष नारायण मुंचडीकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच पिरनवाडीचे नेते व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष यांच्या सौजन्याने पिरनवाडी आणी परिसरामध्ये पाणी पुरवठ्यासाठी टँकर सोडण्यात आले.

यावेळी युवा समिती सिमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले, नारायण मुंचडीकर प्रमाणे सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकांची तहान भागवण्यासाठी पुढे यावे. असे मनोगत व्यक्त करताना नारायण मुंचडीकर यांचे कौतुक केले त्याच बरोबर हा उपक्रम हाती घेत असताना महाराष्ट्र उध्दव ठाकरे तसेच राज ठाकरे यांची एकत्र येण्याची चर्चा महाराष्ट्रात जोर धरत असताना सिमाभागातल्या मराठी भाषिकांना याचं सर्मथन करत दोन्ही भावंडांनी एकत्र येऊन खंडीत महाराष्ट्रला अखंड करावं आशी भावना व्यक्त केली.

युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, शिवसेना उपतालुकाप्रमुख पिराजी शिंदे, युवा समिती सरचिटणीस मनोहर हुंदरे, नारायण मुचंडीकर, आणि उपाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते पाणी टँकरची पुजा करण्यात आली.

यावेळी नारायण मुंचडीकर यांनी मनोगत व्यक्त करताना या भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे जर कुणाला पाण्याची गरज भासल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले.
यावेळी युवा समितीचे उपखजिनदार इंद्रजीत धामाणेकर ओमकार आपटेकर, रामनाथ मुंचडीकर, अरविंद मुंचडीकर, किरण मुंचडीकर, सागर कडेमनी, सुभाष पाटील, रिचर्ड ऑनथोनी, मधू यळ्ळूरकर, नंदकुमार मुंचडीकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रा. आर. एस. पाटील यांची ‘Achievers of Karnataka’ पुरस्कारासाठी निवड

Spread the love  खानापूर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *