बेळगाव : बेळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात बेटिंग चालवणाऱ्या मुख्य सुत्रधाराला बेळगाव शहर सायबर क्राईम (सीईएन) पोलिसांनी अटक केली आहे.
सीपीआय गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली सीईएन पोलिसांनी आयपीएल सामन्यांवरील लाखो रुपयांच्या सट्टेबाजीत गुंतलेल्या बेटिंग अड्ड्यावर छापा टाकून उद्धव जयरामदास रोचलानी (61) या मुख्य सुत्रधाराला अटक करण्यात आली आहे, तर करण उद्धव रोचलानी फरारी आहे.
अटक करण्यात आलेल्या उद्धव रोचलानी याच्याकडून 12 मोबाईल, 13 साधे मोबाईल, 1 हॉटलाइन व्हिडिओ मिक्सर, 1 स्मार्ट टीव्ही आणि 2 लाख रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस बुकींचे नेटवर्क तपासत असून, आता क्रिकेट सट्टेबाजी करणाऱ्या बुकींवर धडक कारवाई सुरू झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta