Friday , March 6 2026
Breaking News

शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

Spread the love

 

बेळगाव : पारंपरिक वेशभूषेत नटलेले शिवभक्त… ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष… अग्रभागी मुख्य रथावर असणारी शिवज्योत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य मूर्ती… अशा स्फूर्तिदायी अन् ‘शिवमय’ वातावरणात छत्रपती शिवाजी उद्यान येथे सकाळी सहा वाजता शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवछत्रपतींना प्रेरणा मंत्र म्हणून विधीपूर्वक पूजनाचे सुरवात करण्यात आली.
महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व जलाभिषेक शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते घालण्यात आला. यानंतर विधीपूर्वक पूजन करण्यात आले महामंडळाचे सरचिटणीस जे. बी. शाहपुरकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून महाराजांची सामूहिक आरती झाल्यावर मोतीचंद लाडू, व गुलाबजाबून वाटण्यात आला तसेच उपस्थित कार्यकर्त्यांनी “जय भवानी जय शिवाजी” असा जयजयकार केला. यावेळी विविध दुर्गवीर किल्ल्यावरून शिवज्योत आणणाऱ्या मावळ्यांनचे स्वागत चित्ररथ महामंडळाचे पदाधिकाऱ्यांनी केले.

यंदाचे चित्ररथ मिरवणूक आव्हानात्मक असून शिवभक्तांना चित्ररथ देखावा सादर करण्यासाठी चांगले परिश्रम घेतले आहे. शिवजयंती चित्ररथा वरील देखावे मोठ्या दिमाखात सादर करावे,व शांततेने आणि सुरळीत मिरवणूक पार पाडण्याची जबाबदारी साऱ्यांचीच आहे, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी केले.

जे. बी. शहपूरकर यांनी त्यांच्या मनोगतामध्ये छत्रपती शिवरायांनी मराठी माणसाचा कणा ताठ करून, त्याला सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांचा आदर्श प्रत्येक शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व गल्लीतील युवा पिढीने घेतला पाहिजे, असे सांगितले.

यावेळी उपस्थित शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, प्रमोद कंग्राळकर, सरचिटणीस जे. बी. शहपूरकर, मारुती पाटील, भूषण पाटील, मंथन कडोलकर, पूजा किणीकर, उमेश ताशीलदार, विजय कुंटे, सलोनी भोसले, गौरी कंग्राळकर, समीक्षा अष्टेकर, वैशाली चौगुले, खुशी भोसले, प्रियांका पावशे, ओंकार खानडोळकर आदित्य जाधव, राधिका साळुंखे, दयानंद मठकर शिवम चौगुले, प्रथमेश सालगुडे, शिवाजी पाटील, विजय दळवी यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कर्तव्य कठोर… पण मन माणुसकीने ओथंबलेले!

Spread the love  डी डी पी यू श्री एम एम कांबळे यांचे भावस्पर्शी छायाचित्र! बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *