
बेळगाव : सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ व अन्नपूर्णेश्वरी महिला मंडळ यांच्या वतीने पारंपारिकरित्या शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा देखावा सादर करण्यात आला. यावेळी महिला व बाळगोपाळांचा मोठा सहभाग होता. झांजपथकाने वेगळ्या प्रकारे झांज वाजवून नृत्य सादर केले. यावेळी मंडळ कार्यकर्ते विनोद हंगिरगेकर, सुधीर सुतार, सागर बडमंजी, पुंडलिक गोरे, उदय चव्हाण, प्रसाद मनोळकर, विजय हणमार, ज्योतिबा हंगिरगेकर यांनी विशेष परिश्रम घेऊन मिरवणूक यशस्वी केली.
Belgaum Varta Belgaum Varta