पुणे : शब्दरजनी साहित्य समूह, पुणे महाराष्ट्र आयोजित ‘मुक्तायन’ राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. विविध भागांतील कवींच्या सहभागातून निवड झालेल्या काही निवडक काव्य रचनांना पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
सर्वोत्कृष्ट कवी म्हणून नीलिमा फाटक (निगडी, पुणे), नवनाथ रामकृष्ण मुळवी (फोंडा, गोवा) व हिरामण सोनवणे (धुळे) यांची निवड करण्यात आली.
उत्कृष्ट पुरस्कार: अरुण बिजवे (यवतमाळ), करुणा शिंदे (शिवाजीनगर, पुणे), अशोक काळे (बदलापूर)
प्रथम क्रमांक: वत्सला पवार पाटील (परभणी), प्राजक्ता पाठक (डोंबिवली), सुचिता पाटील (नागपूर), रेखा जेगरकल (दापोली)
द्वितीय क्रमांक: तनुजा शिंदे (पुणे), विद्या प्रधान (ठाणे), वैशाली जगताप-बोरसे (धुळे), शोभा कोठावदे (नवी मुंबई)
तृतीय क्रमांक: विद्या पंडित (पुणे), अलका कुलकर्णी (मुंबई), वीणा पाटील (कोल्हापूर), स्वाती लेले (मुंबई)
उत्तेजनार्थ: मनीषा पटवर्धन (रत्नागिरी), मेघना चितळे (चिपळूण), राही लिमये (पुणे), प्रतिभा कुलकर्णी (नवी मुंबई), सुरेखा दहिवेलकर
विशेष उल्लेखनीय: वर्षा तुपे (पुणे), मेघा मुकुंद (मुंबई), किरणताई मोरे चव्हाण (गोंदिया), गीतांजली गाढे (अहिल्यानगर), अनिता जोशी (पुणे)
या सर्व विजेत्यांचे शब्दरजनी साहित्य समूह, पुणे यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, पुढील उपक्रमांबाबत लवकरच माहिती देण्यात येणार आहे.