
बेळगाव : काही दिवसांपासून कांद्याच्या दरात चढ-उतार होत होती, मात्र आता त्यात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा विक्रीसाठी एपीएमसीत आलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. दर इतका घसरला आहे की, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून येत नाही.
बेळगावसह महाराष्ट्रातील कांदा थेट बेळगावच्या एपीएमसी मार्केटमध्ये येतो आहे. पण, तिथे केवळ 1300 ते 1500 रुपये प्रति क्विंटल अशा अत्यंत कमी दराने कांदा विक्री होत आहे. एक एकर कांदा पिकवण्यासाठी 70 ते 80 हजार रुपये खर्च होतो. मात्र सध्याच्या दराने ते वसूल होणे अशक्यच असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. महाराष्ट्रातील बाजारातही कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात पडल्याने, बाजारात आणलेला कांदा शेतकऱ्यांना अगदी नाममात्र दरात विकावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा खर्च निघत नसल्याने हातातोंडाशी आलेलं पीक देखील तोटा देऊन जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta