
बेळगाव : थायलंड, पटाया येथे १० ते १३ मे च्या दरम्यान होणाऱ्या जागतिक पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी बेळगावचा उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू विनोद पुंडलिक मेत्री याची निवड झाली आहे. कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना व स्पोर्टस्, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व स्पोर्टस्, संजय सुंठकर स्पोर्टस् फौंडेशनच्या वतीने मेत्री यांचा सत्कार झाला.
राज्याध्यक्ष संजय सुंठकर, अनिल अंबरोळे, राजेश लोहार, प्रवीण कणबरकर यांच्या हस्ते विनोद मेत्री यांना पुष्पगुच्छ देण्यात आला. तसेच स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी राज्याध्यक्ष संजय सुंठकर यांनी स्पर्धेदरम्यान विनोदच्या खर्चासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. विनोदने अनेक जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत अनेक किताब व बेस्ट पोझरचा मान मिळविला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta