
बेळगाव : मुतगा येथे हनुमान यात्रेनिमित्त रविवार दि. 10 एप्रिल रोजी कुस्ती आखाडा भरवण्याचा निर्णय कलमेश्वर मंदिरात गावकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे हनुमान यात्रेला आखाडा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. नियोजनाबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला पै.भावकाना पाटील, पै. श्रीकांत पाटील, आप्पाना बस्तवाड, पै.जोतिबा केदार, सातेरी पाटील, पै.सुहास पाटील, तुकाराम पाटील, नामदेव पाटील, जानबा पाटील, जयसिंग पाटील, पै.कृष्णा शिंदोळकर, सिद्दाप्पा पाटील, चंद्रकांत पाटील, बाळकृष्ण पाटील, भैय्याजी पाटील, पै.विलास पाटील पै.नवीन पाटील यांच्यासह कुस्ती कमिटीचे सदस्य, गावकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta