
धामणे : माध्यमिक विद्यालयाची शाळा सुधारण कमिटी व माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने शाळा इमारत बांधण्याचा संकल्प केला असून या कामाची सुरुवात दि. 23 रोजी अपरा भद्रकाली उप भाद्र नक्षत्र व प्रीती योग या शुभ मुहूर्तावर शाळा इमारत कॉलम पूजा श्री. रमाकांतदादा कोंडुसकर (अध्यक्ष, श्रीरामसेना हिंदुस्थान, बेळगाव) व श्री. पंडित पाटील (अध्यक्ष ग्राम पंचायत, धामणे) यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. इमारत कॉलम पूजा ह.भ.प. मारुती महाराज यांच्या सानिध्यात झाली.
या कार्यक्रमाला श्री. महादेव येळवी (अध्यक्ष, नवभारत सोसायटी, धामणे), श्री. रवी बस्तवाडकर, श्री. उमेश डुकरे, श्री. विजय बाळेकुंद्री, श्री. दीपक बाळेकुंद्री, श्री. शिवाजी चौगुले, श्री. शिवाजी पाटील, श्री बाळु जायनाचे, श्री. बाळु बाळेकुंद्री, श्री. राहुल बाळेकुंद्री, श्री. मोहन पाटील, श्री. संदीप पाटील, श्री. गोपाळ बाळेकुंद्री, श्री. भोज सावकार व शाळेतील शिक्षक वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या वेळी श्री. रमाकांतदादा कोंडुसकर यांनी या बांधकामासाठी 21 हजार रुपये देणगी दिली, त्याचप्रमाणे श्री. पंडित पाटील यांनी 5 हजार 5 रुपये देणगी दिली. तसेच इतर मान्यवरांनीही देणगी जाहीर केल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta