
बेळगाव : कर्नाटक राज्य पोलिस विभागाने केंद्र सरकारकडे एकाच वेळी २० उपमहानिरीक्षक (डीआयजी) पदे व एक डीजीपी पद नव्याने निर्माण करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यामुळे सेवेंत वरिष्ठतेनुसार अनेक एसपी अधिकाऱ्यांना एकाचवेळी बढती मिळण्याची शक्यता आहे. या प्रस्तावात जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांचे नाव आहे. तसेच यापूर्वी बेळगावला पोलिसप्रमुख म्हणून सेवा बजाविलेले संजीव पाटील यांचेही नाव आहे. त्यामुळे गुळेद यांच्या बढतीची शक्यता आहे. सध्या राज्यात एसपी दर्जाचे आयपीएस अधिकारी २२४ पेक्षा अधिक आहेत. त्यामुळे काही एसपी पदांचे रूपांतर डीआयजी कॅडरमध्ये करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची योजना आखली आहे. प्रस्तावाला यूपीएससी आणि केंद्र सरकारतर्फे लवकरच मंजुरी मिळेल, अशी शक्यता असून, २०२६ च्या सुरुवातीला पदोन्नती प्रक्रिया पार पडणार आहे. यामुळे शासनाकडून संभाव्य बढतीची यादी तयार केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta