बेळगाव : आरसीबी संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी चन्नम्मा सर्कल जवळ जमलेल्या हजारो आरसीबी चाहते जमले होते त्यांना पांगवण्यासाठी किरकोळ लाठीचार्ज करण्यात आला.
चन्नम्मा सर्कलजवळ लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. आरसीबी जिंकताच, लोकांचा जल्लोष आणि नाच मर्यादेपलीकडे गेला. हे बराच वेळ चालू राहिल्याने पोलिस रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न करत होते. पण अतिउत्साही आरसीबी चाहते काही केल्या ऐकण्यास तयार नव्हते परिणामी पोलिसांना किरकोळ लाठीचार्ज करावा लागला.
Belgaum Varta Belgaum Varta