
उचवडे : उचवडे (ता. खानापूर ) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक सुरेश रोटी हे आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ शिक्षकी सेवेतून नुकतेच निवृत्त झाले. त्यामुळे उचवडे येथील महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने त्यांचा हृधसत्कार करण्यात आला.
वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री कलमेश्वर युवक संघाचे अध्यक्ष व्ही. एन. पाटील हे होते.
सत्कारमूर्ती सुरेश रोटी यांचा महात्मा फुले वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सुरेश रोटी यांनी आपल्या 35 वर्षांच्या सेवेतील चार वर्षे रायचूर जिल्ह्यातील लिंगनहळी येथे सेवा बजावली तर उर्वरित सर्व सेवा म्हणजे तीस वर्षे उचवडे येथील प्राथमिक शाळेत उत्कृष्ट सेवा बजावली त्याबद्दल विठ्ठल पाटील यांनी त्यांच्याबद्दल गौरव उद्गार काढले.
यावेळी मनोज पाटील, कृष्णा गुरव, मारुती देसाई, शिवाजी सक्रोजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta