
बेळगाव : ग्राम पंचायत येळ्ळूर, जिल्हा व तालुका पंचायत बेळगाव यांच्या आदेशाप्रमाणे “आमची संपत्ती आमचा कर ” या माध्यमातून येळ्ळूर व अवचारहट्टी गावातील नागरिकांना 10/03/2022 पासून 31/03/2022 पर्यंत घरपट्टी कर व पाणीपट्टी कर या वर शेकडा 10% सूट दिली जाणार आहे तरी गावातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष, पीडिओ सर्व सदस्यांनी केले आहे. तसेच प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक्ष जाऊन हा कर आकारला जाणार आहे. यासाठी प्रत्येक वार्डमध्ये एकदिवस ठरविला जाईल त्याप्रमाणे त्या-त्या गल्लीतील नागरिकांनी आपला कर भरून रीतसर पावती घ्यावी, अशी विनंती केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta