
बेळगाव : शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त मराठा सेवा संघ बेळगाव शाखेचा मराठा व्यवसाय विभाग व पुण्यातील लक्ष्य एज्युकेशन सर्व्हिसेसतर्फे मराठा उद्योजकांसाठी मंगळवारी (दि. १०) मार्गदर्शन मेळावा आयोजित केला आहे. गणेश कॉलनी, वडगावमधील मराठा सेवा संघाच्या हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी कोल्हापूरमधील माईंड ट्रेनर व मोटिव्हेशनल स्पीकर विनोद कुराडे व्यवसाय वाढीसाठी माईंड पॉवरचा वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मराठा समाजातील सर्व उद्योजकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta