
बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने दहावी व बारावीच्या बोर्ड परिक्षेत बेळगाव शहरात सर्वप्रथम आलेल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन रविवारी जीजीसी सभागृहात विशेष सन्मानित करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त मेजर जनरल के. एन्. मिरजी उपस्थित होते.
प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. मुख्य अतिथिंच्याहस्ते भारतमाता, अहिल्यादेवी व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. स्वाती घोडेकर यांनी परिषदेच्या कार्याची माहिती दिली. पांडुरंग नायक यांनी अतिथींची ओळख करून दिली. रामचंद्र एडके यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवचरित्र सांगितले. यावेळी बोलताना मेजर जनरल के. एन्. मिरजी यांनी भारतीय सैन्यातील सुसंधी, राष्ट्रीय सुरक्षा व ऑपरेशन सिंदूर याबाबत आपले विचार व्यक्त केले.
इंग्रजी माध्यमात शहरात सर्वप्रथम आलेल्या निधी कंग्राळकर, निलांबिका बुबनाळे व अनुषा देसाई (६२४/६२५, तिघीही सेंट जोसेफ स्कूल), मराठी माध्यमात शहरात प्रथम आलेला प्रसाद मोळेराखी (६१६/६२५, मराठी विद्यानिकेतन) व कन्नड माध्यमात प्रथम चैतन्या गडलिंगन्नवर (६२०/६२५, सरस्वती गर्ल्स हायस्कूल), त्याचप्रमाणे बारावीच्या परीक्षेतून वाणिज्य विभागात प्रथम तन्वी पाटील (५९७/६००, गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स), विज्ञान विभागात प्रथम सृष्टी आपटेकर (५९४/६००, आर. एल्. एस्. कॉलेज) व कला विभागात प्रथम महालक्ष्मी कुसगुर (५८८/६००, आर. पी. डी. कॉलेज) यांना रोख स्कॉलरशिप, खास प्रशस्तीपत्र आणि आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन पालकांसह मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले. प्रमुख अतिथी मेजर जनरल के. एन्. मिरजी यांचा अध्यक्ष विनायक मोरे यांनी शाल, पुष्गुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी भारत विकास परिषदेच्या सदस्यांच्या गुणवंत पाल्यांनाही खास पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
प्रतिभा हल्लप्पणवर यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले. व्ही. आर. गुडी यांनी कार्यक्रम संयोजन केले. सेक्रेटरी के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले. कार्यक्रमास व्ही. एन्. जोशी, श्रीनिवास शिवनगी, डी. वाय. पाटील, विनायक घोडेकर, सुभाष मिराशी, गणपती भुजगुरव, पी. एम्. पाटील, रामचंद्र तिगडी, जयंत जोशी, पी. जे. घाडी, विजय हिडदुग्गी, शिवानंद मगदूम, सुधन्व पुजार, प्रा. अरुणा नाईक, जया नायक, शुभांगी मिराशी, प्रिया पाटील, स्मिता भुजगुरव, लक्ष्मी तिगडी, ज्योती प्रभू, ज्योत्स्ना गिलबिले, अनिता हिडदुग्गी, गीता बागेवाडी, शालिनी नायक आदी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta