बेळगाव : बेळगावातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी खासदार संभाजी राजेंची कोल्हापूर येथे भेट घेतली. सर्वप्रथम बेळगाव येथील मराठा समाजाच्या नेत्यांनी खासदार संभाजी महाराजांचे अभिनंदन केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण केले आणि त्यांच्या मागण्या मान्य झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
बेळगाव येथील मराठा समाज एकत्र यावा यासाठी काही मराठा समाजाचे नेते एकवटले आहेत, त्या अनुषंगाने नुकतेच बेळगावमधील एक शिष्टमंडळ बेंगलोर येथे जाऊन मराठा समाजाचे स्वामी मंजुनाथ स्वामी यांची भेट घेतली आणि त्यांनी बेळगावला येण्याचे आमंत्रण दिले. स्वामींच्या बेळगाव दौऱ्यादरम्यान मराठा समाजातर्फे स्वामींचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी मराठा समाजाला एकत्रित आणण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती बेळगावच्या शिष्टमंडळाने महाराजांकडे केली. त्यांच्या विनंतीला मान देत आपण बेळगावच्या मराठा समाजाला एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन देत मंजुनाथ स्वामींच्या सत्काराला आपण उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी बेळगावमधील मराठा समाजाचे नेते माजी महापौर शिवाजी सुंठकर, संजय मोरे, तालुका युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, पुंडलिक पावशे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अश्या घोषणा दिल्या.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …