
बेळगाव : सुळगा (हिंडलगा) येथील एका शेडमध्ये एका गवंडी कामगाराचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.।खानापूर तालुक्यातील गस्टोळी दड्डी (ता. खानापूर) येथील हा गवंडी कामगार असून शुक्रवारी सकाळी खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. कुबेर देमाण्णा दळवाई (वय 36 वर्ष) राहणार गस्टोळी दड्डी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
एका खासगी लेआऊटमध्ये तो गवंडी काम करीत होता. याच परिसरातील शेडमध्ये कुबेर व त्याचे अन्य साथीदार वास्तव्य करून होते. शुक्रवारी 13 जून रोजी सकाळी कुबेरचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.
घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे व त्यांच्या सहकाऱ्याऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कुबेरच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. आज शनिवारी 14 जून रोजी, सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात त्याच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे. खुनानंतर शेडमधील त्याचे साथीदारही फरारी झाले आहेत, अशी माहिती मिळाली असून त्यांची चौकशी झाल्यानंतरच याविषयी अधिक माहिती बाहेर पडणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta