
बेळगाव : कंग्राळ गल्ली येथील श्री छत्रपती शिवाजी व्यायाम शाळेचे मास्टर्स शरीरसौष्ठवपंटू सदानंद बडवाण्णाचे यांनी राज्यस्तरीय मास्टर्स शरीरसौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे, उडपी येथे नुकत्याच कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत 60 वर्षावरील मास्टर्स गटात सदानंद बडवाण्णाचे यांनी कांस्यपदक पटकावित नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते रोख रक्कम प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. सदानंद बडवाण्णाचे यांना आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्धांण्णावर, मोरया जीमचे संचालक शेखर जाणवेकर, मॉडर्न जीमचे संचालक रितेश कावळे यांचे मार्गदर्शन तर गजानन कावीलकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे, त्यांच्या या यशाबद्दल कंग्राळ गल्लीच्या वतीने त्यांचे खास अभिनंदन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta