Friday , November 6 2026
Breaking News

तिसरे रेल्वे गेट तीन दिवसासाठी बंद

Spread the love

बेळगाव : रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामामुळे बेळगाव शहरातील लेव्हल क्रॉसिंग गेट नंबर 381 म्हणजे तिसरे रेल्वे गेट आता तीन दिवसासाठी बंद असणार आहे.

रेल्वे मार्गदुपदरी करणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे यासाठी हा गेट तीन दिवस बंद करण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतलेला आहे 12 मार्च रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 14 मार्च सायंकाळी 6 पर्यंत हे रेल्वे गेट बंद असणार आहे. त्यासाठी वाहनधारकांनी या रस्त्याचा वापर न करता पर्यायी रस्ता निवडावा, असे आवाहन रेल्वे खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.

बेळगाव शहरात सध्या रेल्वे मार्गाच्या दुपदरी करणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे यासाठी शहरातील विविध रेल्वे गेट काही काळासाठी बंद होत आहेत. मागील आठवडाभरात तानाजी गल्ली पहिले रेल्वे गेट बंद झालं होतं. त्यानंतर पहिले दुसरे रेल्वे गेट बंद होते. आता तिसरे गेट देखील तीन दिवसांसाठी बंद असणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *