बेळगाव : मराठी विद्यानिकेतनच्या सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजनेसाठी शाळेचे माजी पालक, अन्नपूर्णा सामाजिक संस्थेचे संचालक श्री. मोहन नारायण कुंभार यांनी एक लाख दोन हजार रुपयांची भरघोस देणगी दिली. श्री. मोहन कुंभार हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांची दोन्ही मुले मराठी विद्यानिकेतन शाळेत शिकलेली आहेत. त्यांचे स्वतःचे वर्कशॉप आहे. मराठी विद्यानिकेतन शाळेतर्फे गेली दहा वर्षे सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजना राबविण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून अनेक होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येत आहे. आजपर्यंत ३० हून अधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी त्यांचे या आर्थिक देणगी बाबत आभार व्यक्त केले व कृतज्ञतापूर्वक सत्कार ही केला. यावेळी उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, सीए विनायक जाधव, शिक्षण संयोजिका नीला आपटे, मुख्याध्यापक नारायण उडकेकर, बी.जी. पाटील, सविता पवार उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta