
बेळगाव : भेटी लागे जीवा सावळा श्रीरंग.. दरवर्षी बेळगावसह सीमाभागातून हजारो वारकरी आषाढी एकादशीसाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला वारीत सहभागी होण्यासाठी जात असतात. तसेच अनेक वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी आसुसलेले आहेत. बेळगाव आणि परिसरातूनही हजारोंच्या संख्येने वारकरी यावर्षीच्या वारीत सहभागी होत आहेत.
आज धामणे ते पंढरपूर पायी दिंडी विठ्ठल रुक्मिणी मंदिर धामणे येथे दुपारी 1 वाजता श्री. विलास प. बिर्जे व सौ. अर्चना विलास बिर्जे यांनी विठ्ठल रुक्मिणीचे पूजन केले. पालखी पूजन देवस्थानी पंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. दिंडीचे पूजन उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, वारकरी आणि गावकऱ्यांच्या हस्ते करून शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर धामणे येथून सुरू झालेली दिंडी, कलमेश्वर गल्ली, चव्हाटा, गणपती मंदिर, मारुती मंदीर, लक्ष्मी मंदीर, शहापूर गल्ली, बस स्टॉप, पाटील गल्ली, बसवाण गल्ली, ब्रम्हलिंगहट्टी (कुरबरहट्टी), मासगौंडहट्टी, देवगणहट्टी, यरमाळ रोड मार्गे पाटील गल्ली वडगांव, जुनेबेळगांव कलमेश्वर मंदिर येथे दिंडीचा मुक्काम असून उद्या सकाळी पुन्हा दिंडी मार्गस्थ होणार आहे.
कार्यक्रमाला देवस्थानी पंच बाबा पाटील, पराशराम रेमानाचे, जगन्नाथ येळवी, ग्रामपंचायत सदस्य यल्लपा रेमानाचे, शिवाजी पाटील, राजू बडगेर, मनोहर पाटील, यल्लपा चौगुले, कोनेरी बाळेकुंद्री, माजी ग्रा. प. सदस्य विजय बाळकुंद्री, युवराज महाराज, मादकाचे मनोहर महाराज, जायानाचे, लक्ष्मण महाराज येळूरकर, राजू महाराज जायानाचे, फकीर सावंत, दिंडी चालक, कमिटी पंचक्रोशीतील बालक, महिलावर्ग, गावकरी व इतर भक्तजन उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta