Wednesday , March 4 2026
Breaking News

म. ए. समिती शहापूर यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर आणि कोरे गल्ली पंच मंडळाकडून शहापूर भागातील गुणवंत विद्यार्थीसह क्रीडास्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गल्लीचे सरपंच सोमनाथ कुंडेकर, प्रमुख पाहुणे मदन बामणे, नेताजी जाधव, राजकुमार बोकडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन आणि गणेश पूजनाने पाहुण्याच्या हस्ते झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांचा आणि जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल विशेष सत्कार ऐश्वर्या माणकोजी हिचा करण्यात आला. कार्यक्रमास गजानन शहापूरकर, अभिजीत मजुकर, रवी जाधव, परशराम शिंदोळकर, मनोहर शहापूरकर, शिवाजी हवळानाचे, पंच शांताराम मजुकर, मोहन पाटील, विजय डम, किरण पाटील, शिवाजी उचगावकर, चंद्रकांत मजुकर, महेश पाटील, सुरज किल्लेकर, सुधीर नेसरीकर, प पी.जी मंडोळकर, रणजीत हवळानाचे यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *