
बेळगाव : गोव्याहून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष प्रेमानंद गुरव कुटुंबीयातर्फे स्वागत करण्यात आले तसेच भूतरामहट्टी येथील मुक्तिधाम येथे पंढरपूरकडे निघालेल्या वारकरी व भाविकांना महाप्रसाद उपलब्ध करून दिला आहे.
केरी सत्तरी येथील माऊली वारकरी संप्रदायतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरपर्यंत पायी दिंडी काढली जात आहे. पावसाचा जोर कायम असला तरी गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी वास्तव्य करीत दिंडी पुढे जात असून मुक्तीधाम येथे गुरव कुटुंबीयातर्फे पालखी पूजन करण्यात आले तसेच महाप्रसाद तालुका वितरण करण्यापूर्वी भजन व आरती पार पडली. त्यानंतर वारकरी पूजन करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी दिंडी प्रमुख रुपेश बांदेकर यांनी गोव्याहुन पंढरपूर पर्यंत विठू नामाचा गजर करीत जात असताना अनेक भक्तांकडून सेवा केली जाते. त्यामुळे अनेक किलोमीटरचा प्रवास करताना देखील कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. गुरव कुटुंबाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली असून वारकरी बांधवांची सेवा करण्याचे व्रत त्यांनी कायम ठेवले आहे असे मत व्यक्त केले.
प्रेमानंद गुरव यांनी गेल्या काही वर्षांपासून दिंडी सहभागी होणाऱ्या वारकरी बांधवांची सेवा केली जात आहे. यामध्ये संपूर्ण कुटुंब सहभागी होत असून वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांना सहकार्य केले जाते त्यामुळे समाधान मिळते असे मत व्यक्त केले. यावेळी प्रतिक गुरव, ऍड. किशोरी गुरव, पूजा गुरव, महेश बिर्जे, सतीश कुगजी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta