
बेळगाव : पिरनवाडी येथे बेळगाव खानापूर रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले आहे त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. या रस्त्यावरून ये-जा करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. खानापूर तालुक्यातील बरेच युवक उद्यमबाग येथे कामानिमित्त येत असतात पिरनवाडी येथील भाजी मार्केट समोर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून दुचाकी चालविणे कठीण झाले होते. या ठिकाणी काही दिवसांपासून लहानमोठे अपघात होत होते. त्यामुळे पुढील संभाव्य धोका ओळखून खानापूर तालुक्यातील संगरगाळी येथील सुनील गावडे, मोहन जळगेकर, महेश गावडे, रोहित डांगी, नवनाथ डांगी, श्याम पाटील, महेश यळ्ळूरकर आदी युवकांनी चक्क काँक्रीटची गाडी बोलावून रस्त्यावरील दोन भले मोठे खड्डे बुजविले. संगरगाळी गावातील युवकांनी स्वखर्चातून केलेले हे कार्य म्हणजे प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. या युवकांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta