
बेळगाव : गोकाक यात्रेत दरम्यान हवेत गोळीबार केल्याच्या प्रकरणावरून भाजप आमदार रमेश जारकीहोळी यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश जारकीहोळी यांचा मुलगा संतोष जारकीहोळी यांच्याविरुद्ध गोकाक शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील लक्ष्मी देवी यात्रेवेळी संतोष जारकीहोळी यांनी पोलिस आणि जनतेच्या उपस्थितीत हवेत गोळीबार करून गोंधळ घातला. आमदाराच्या मुलाच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच संतोष जारकीहोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta