Sunday , July 26 2026
Breaking News

पाटील मळा येथील जुने दुमजली घर कोसळून मोठे नुकसान

Spread the love

 

बेळगाव : मुसळधार पावसामुळे शहरातील ठिकठिकाणी जीर्ण घरे कोसळत असून पाटील मळा येथील एक सुमारे 85 वर्षे जुने दुमजली घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी घडली.

सदर घर रामचंद्र गांधी यांच्या मालकीचे असून 1940 मध्ये ते बांधण्यात आले होते. त्यामुळे काळानुसार या घराचे बांधकाम जीर्ण झाले होते. पाटील मळा येथील 303/32 सीटीएस क्रमांकाच्या या घराची दुमजली इमारत अलीकडच्या काळात धोकादायक बनली असल्यामुळे तेथे कोणी राहत नव्हते असे समजते. रिकामे पडून असलेले हे घर सध्याच्या पावसामुळे काल सायंकाळी पूर्णपणे कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती मिळताच आज शनिवारी बेळगावचे तलाठी श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन कोसळलेल्या घराचा पंचनामा केला. याप्रसंगी घरमालक रामचंद्र गांधी यांच्यासह अभियंता अक्षता अडगुणकर, बिल कलेक्टर निंगाप्पा जी. डी. आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *