
बेळगाव : बेळवट्टी (बाकनूर) येथील श्री महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीच्या अध्यक्षपदी बी. बी. देसाई व उपाध्यक्षपदी परशराम गाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे आर. आर. गोवनकोप उपस्थित होते.
याआधी झालेल्या सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बी. बी. देसाई, परशराम गाडेकर, नारायण नलावडे, अर्जून पाटील, पांडूरंग नाईक, रामलिंग देसाई, आप्पू नाकाडी, मधू नलावडे, अशोक मजूकर, तुकाराम कांबळे, सावित्री चौगुले, वैष्णवी सुतार, निर्मला गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती.
निवडणुक अधिकारी गोवनकोप्प यांच्या अध्यक्षतेखाली नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आर. बी. देसाई, नारायण नलावडे, अशोक मजूकर, पांडूरंग नाईक आदीनी नुतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचे अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष देसाई यांनी अध्यक्षपदी आपली बिनविरोध निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले व सर्वाना विश्वासात घेऊन संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. सोसायटीच्या सचिव मयूरी हरगुडे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta