
बेळगाव : बेळगाव येथील डी. वाय. सी. भरतेश शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा शुभारंभ शाळेच्या प्रांगणातून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. शाळेच्या पटांगणातून या दिंडीचा शुभारंभ श्री. एम. बी. बखेडी आणि सर्व शिक्षकवर्ग यांच्या हस्ते करण्यात आला. विठ्ठल रखुमाई तसेच तुकाराम महाराज, सोपानदेव, ज्ञानदेव, चोखामेळा, मुक्ताई, जनाई यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी नटूनथटून आकर्षक वेशाभूषामध्ये शाळेत आले होते. कार्यक्रमात मुख्याध्यापक व इतर शिक्षकवर्ग यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई यांची यथासांग पूजा करून, विठ्ठल रखुमाई, वारीच्या दिंडीचे महत्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगून कार्यक्रमाची सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta