Wednesday , March 4 2026
Breaking News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शानदार पथसंचलन

Spread the love

बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बेळगाव नगर यांच्यावतीने रविवारी शहरातील प्रमुख मार्गावर संघ स्वयंसेवकांचे शानदार पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. येथील लिंगराज महाविद्यालयाच्या मैदानापासून पथसंचलनाला सुरुवात झाली. प्रारंभी भगवा ध्वजास वंदन करून संघ प्रार्थना झाली.
त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता मैदानापासून पथसंचलनास सुरुवात झाली. कॉलेज रोड, गोंधळी गल्ली, कंग्राळी गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली आदी भागात पथसंचलन झाले. यावेळी विविध मार्गावर विविध संघटना आणि नागरिकांनी भगव्या ध्वजावर तसेच संघ स्वयंसेवकावर पुष्पवृष्टी करून पथसंचलनाचे जोरदार स्वागत केले. यावेळी घोषणाबाजी करण्यात येत होती.
लिंगराज कॉलेज मैदानावर पथ संचलनाची सांगता झाली. संचलनात हजारो स्वयंसेवकांनी सहभाग दर्शवला होता. संघाच्या तालबद्ध घोष वादनाने संचलनाला वेगळीच उंची लाभली होती.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *