Sunday , September 8 2024
Breaking News

‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ वतीने महिला दिनाचा जागर

Spread the love

बेळगाव : ‘मजदूर नवनिर्माण संघातर्फे’ बेळगांव तालुक्यातील महिलांचा जागर आंबेवाडी ग्रामपंचायतीत येणाऱ्या मण्णूर गावामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात (काजूच्या बागेत), महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय व सुत्रसंचलन यशोदा गोविंदाचे यांनी सांभाळलं त्यांना सुधिर काकतकर यांनी सहाय्य केले. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व द्विप प्रज्वलन करण्यात आले, नंतर व्यासपीठावरील उपस्थितांच स्वागत गुलाबपुष्प देऊन महिला व ग्रामस्थांच्या हस्ते केलं.
राणी चन्नम्मा विद्यापिठाच्या (RCU) मराठी विभागाच्या प्राध्यापिका डाॅ. मनिषा नेसरकर, माजी राष्ट्रीय खो-खो प्लेअर व स्पोर्टस कोट्यातून सिलेक्शन झालेल्या एक महिला पोलीस अधिकारी, ASI मंगल पाटील (ट्रॅफिक साऊथ पोलिस स्टेशन बेळगावी) या कर्तृत्ववान महिलां, व बेळगांवचे प्रसिद्ध बांधकाम कामगार नेते, एन.आर. लातूर वकील, जेष्ठ समाजसेवक शिवाजी कागणीकर हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते, अध्यक्षस्थानी सुधा होनगेकर या रोजगाराला जाणाऱ्या एका महिला कामगारांची निवड केली होती. महिला पोलिस अधिकारी ASI मंगल पाटील यांनी बोलताना महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकांनी आपल्या मुलींना शिक्षणाबरोबरच आत्मसंरक्षणाचीही कला जोपासावी असे सांगितले.
महिला दिनाच्या कार्यक्रमात मण्णूरच्या मुलींनी स्वागतगीत व महिला कामगारांनी गाणी गावून कार्यक्रमात रंग भरले.
डाॅ. मनिषा नेसरीकर यांनी महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या भारतीय संस्कृतीतील अढळ स्थान, छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मातोश्री जिजाऊसाहेबांनी कसे घडविले. त्यासाठी एका माऊलीस कसा त्याग करावा लागला हे कथन केले व फक्त त्यामुळेच परकियांपासून आपले संरक्षीत राष्ट्र कसे उभे राहिले यांची माहिती दिली. महिलांनी आपल्या जीवनात नकारात्मक विचार सोडून आपला विकास कसा करावा व त्यासाठी प्रत्येक महिलांनी कणखर बनुन आपल्या कुटुंबाला आधार ध्यावा असा मुलमंत्र दिला.

ॲड. लातूरनी कामगार कार्ड संदभातील माहिती दिली व इतर योजनेची माहिती पुरवली. कामगार कार्डधारकांना वैद्यकीय सेवा, अपघाती विमा, कुटुंबातील 2 मुलांना विद्यार्थी वेतन, 2 मुलांना लग्नासाठी मदतनिधी, तसेच बांधकाम कामगारांना योजनेसंदर्भात उपयुक्त माहिती दिली.
युवा वेटलिफ्टर नकुशा पाटील (हंदिगनूर) व शालेय कुस्तीपटू प्रांजल तुळजाई (अवचारहट्टी) या राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या दोन उदयोन्मुख खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नकुशा पाटील यांनी आपले अनुभव सांगतले, तसेच महिलांना आवाहन केले की, आपापल्या मुलींना फक्त लग्नासाठी तयार न करता स्वबळावर उभी राहण्यासाठी तयार करा, मुलींना जगासोबत लढण्याचे बळ देण्याच्या त्यांच्या जोशपूर्ण आवाहनाने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
ज्येष्ठ समाजसेवक व रोजगाराच्या महिलांचे आधारस्तंभ शिवाजी कागणीकर यांनी महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या, विविध गावांमध्ये रोजगार संदर्भात आलेल्या अडचणी व त्यावर संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनानुसार महिलांनी मिळवलेले रोजगाराचे काम, याबद्दल थोडक्यात माहिती दिली. नेटानं व योग्य प्रकारे कार्यरत राहिल्यास यश नक्कीच मिळेल अशी शाश्वता दिली. तसेच ‘मजदूर नवनिर्माण संघटनेची’ कार्यपद्धती याबद्दल थोडक्यात माहिती उपस्थितांना दिली. आपल्या भाषणावेळी कविता मुरकुट्टी यांनी ‘मजदूर नवनिर्माण संघटनेच्या’ वतीने घोषणा देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी काही महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सरतेशेवटी सुधा होनगेकरनी अध्यक्षीय समारोप केला. मजदूर नवनिर्माण संघाच्या वतीने सुधिर काकतकर (मण्णूर), बसवंत कोले (बंबरगा), कविता मुरकुट्टी (जारकीहोळी), शांता कुरबुर (बिद्रेवाडी), अडव्याप्पा कुबरगी (देवगिरी), यल्लाप्पा गस्ती (दड्डी), शिवाप्पा जिंदराळी (गुडगनट्टी), विठ्ठल देसाई (कर्ले) हे कार्यकर्ते उपस्थित होते. मण्णूर गावातील रोजगारला जाणाऱ्या सर्व महिला, देवस्की पंच, आजी-माजी लोकप्रतिनिधी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, तसेच
दड्डी, आंबेवाडी, गोजगा, तुरमुरी, बाची, जानेवाडी, बेकिनकेरी, येळ्ळूर, बसुर्ते, अवचारहट्टी, बेळगुंदी, कर्ले व बिजगर्णी या गावातील ‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ माध्यमातून रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणाऱ्या शेकडो महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. कार्यक्रमा उपरांत मण्णुरच्या महिलांनी व गावकऱ्यांनी बनवलेल्या सुग्रास जेवणाचा आस्वाद सर्वांनी घेतला. हा महिला दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मण्णूरचे सुधिर काकतकर, संघटनेचे बसवंत कोले, गावकरी, गावातील रोजगारला जाणाऱ्या महिला व मण्णूरच्या कायकबंधू (रेखा तरळे, मालू मंडोळकर, उर्मिला चौगुले, लक्ष्मी कदम, गिता सांबरेकर, राजश्री जैन, सुनिता तरळे, चंदा कालकुंद्री, उर्मिला काकतकर, सुरेखा मंडोळकर, सारिका कदम, कल्पना हुगार, माधूरी चौगुले, सुरेखा पुजारी, रेखा पाटील, सुनिता काकतकर, मनिषा सांबरेकर, अनिता डोणकरी, सविता चौगुले, मालु शहापूरकर, गिता जानाई व माया बाळेकुंद्री) या सर्वांनी भरपूर परिश्रम घेतले, त्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे कितीही आभार मानावे ते थोडेच आहेत, असे राहुल पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी ‘ऑपरेशन मदत’ च्या कार्यकर्त्यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून हजेरी लावून या महिला दिनाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

 

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *