Tuesday , July 21 2026
Breaking News

म. ए. समिती दक्षिण विभागाच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती व महिला दिन साजरा

Spread the love

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती दक्षिण विभागाच्या वतीने आज 10/3/2022 रोजी वडगाव भागात सावित्री बाई फुले जयंती व महिला दिन साजरा करण्यात आला. दक्षिण भागाच्या अध्यक्षा सौ. सुधा भातकांडे, उपाध्यक्ष गीता हलगेकर, सरचिटणीस वर्षा आजरेकर यांनी कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून महिला आघाडीच्या प्रमुख सौ. रेणू किल्लेकर व माजी महापौर सरिता पाटिल उपस्थित होत्या. सौ. रेणू किल्लेकर यांनी महिलानी सर्व क्षेत्रात प्रगतशिल व्हायला पाहीजे. स्वताच्या पायावर कसे उभे राहील पाहिजे हे सांगितले. सौ. सरिता पाटील यांनी महिलाना स्वावलंबी कसे बनावे. मुलींना शिक्षण शिकून मोठे व्हावे संस्कारी बनावे हे सांगितले. सौ. सुधा भातकांडे यांनी येणाऱ्या काळात प्रामुख्याने महिलाच्या साठी वेगवेगळे कार्यक्रम दक्षिण भागात घेतले जातील व महिला आघाडी मोठी करणे, असे सांगितले. प्रास्तविक वर्षा आजरेकर यांनी केले तर आभार गीता हलगेकर यांनी मानले. भागातील अनेक महिला उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर बायपासवर चिखलाचे साम्राज्य; २५ ते ४० दुचाकी घसरल्या, अनेक जखमी

Spread the love    बेळगाव : हलगा-मच्छे बायपासच्या सुरू असलेल्या कामामुळे येळ्ळूर रस्ता बायपास परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *