Monday , September 21 2026
Breaking News

गुंजी सोशल फाऊंडेशनच्यावतीने महिला दिन

Spread the love

बेळगाव : रविवार दिनांक 13 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून गुंजी सोशल फाऊंडेशन गुंजी, यांच्या सौजन्याने श्री सातेरी माऊली सोसायटी हॉल, येथे महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सुधा शिवाजी घाडी ह्या होत्या. कार्यक्रमावेळी व्यासपीठावर शारदा गुरव, बेबीताई कुंभार, हेलन सोज, संध्या पालेकर, पुजा भुतकी, साधना बांदोडकर, लक्ष्मी घाडी उपस्थित होते. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून शुभांगी घाडी आणि दिपाली झेंडे यांची महिला दिनाबद्दल मार्गदर्शनपर भाषणे झाली. तसेच शिवाजी घाडी, शाम गुरव, यांचीही भाषणे झाली. याप्रसंगी डॉ. अश्विनी मोहनराज पुरूषेट्टी यांचा सोशियल फाऊंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, गावातील महिलांवर्ग व गुंजी सोशियल फाऊंडेशचेन कार्यकर्ते प्रसाद, दयानंद, नारायण, मोनेश्री, संदीप व जयकुमार गुरव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गुंडू करंबळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन हेमंत घाडी यांनी केले.

अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *