
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/
——————————————————————
—————————————————————–
कै. बी. एस. पाटील यांची शोकसभा गांभीर्याने
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शिक्षणप्रेमी दिवंगत बाबुराव सातापा पाटील उर्फ बी. एस. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राकसकोप (ता. जि. बेळगाव) येथे समस्त ग्रामस्थातर्फे आयोजित शोकसभा काल सोमवारी गांभीर्याने पार पडली.
राकसकोप येथील शोकसभेप्रसंगी प्रारंभी सर्वप्रथम स्वर्गीय बाबुराव सातापा पाटील यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून सर्व उपस्थितांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर उपस्थितांची कै. बी. एस. पाटील यांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली. याप्रसंगी आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात माजी आमदार मनोहर किणेकर यांनी आपला एक उत्तम सहकारी गमावल्याची खंत व्यक्त केली. शैक्षणिक सामाजिक कार्यामध्ये बी. एस. पाटील यांचे मोलाचे योगदान होतेच त्यापेक्षा पुढे जाऊन त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक लढ्यामध्ये मोलाचा सहभाग दर्शविला होता. त्यांच्या जाण्याने सीमाभागाने एक सच्चा कार्यकर्ता गमावल्याचे दुःख माजी आमदार किणेकर यांनी व्यक्त केले.
शोकसभेप्रसंगी राकसकोप ग्रामस्थ पंच कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ, पंचक्रोशीतील मान्यवर तसेच मराठी व प्राथमिक शाळेचे शिक्षक, विद्यार्थी -विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. शोकसभेचे सूत्रसंचालन शिवराज हायस्कूल राकसकोप येथील शिक्षक सी. एम. पाटील यांनी केले. शेवटी शिवसंत संजय रुक्मान्ना मोरे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
Belgaum Varta Belgaum Varta