Tuesday , September 17 2024
Breaking News

दिव्यांग टे. टे. खेळाडूंचे राज्य स्पर्धेत सुयश

Spread the love

बेळगाव : कर्नाटक राज्य टेबल टेनिस असोसिएशन आणि कर्नाटक राज्य दिव्यांगांसाठीचे टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित 2 ऱ्या कर्नाटक राज्य प्यारा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जेबी स्पोर्ट्स फाऊंडेशन बेळगावच्या दिव्यांग टेबल टेनिसपटू स्पृहणीय यश संपादन केले. 2 ऱ्या कर्नाटक राज्य प्यारा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जेबी स्पोर्ट्स फाऊंडेशन बेळगावच्या दिव्यांग टेबल टेनिसपटुंनी संपादन केलेले यश पुढील प्रमाणे आहे. महिला गट 4 : विजेती ललिता गवस सुवर्णपदक, आरती पवार रौप्यपदक. महिला गट (6-9) : मायवा सन्नींगनावर सुवर्णपदक, सविता आजीनकट्टी रौप्यपदक. पुरुष गट (3-4) : दिनेश सिद्रागवळी रौप्यपदक, अप्पया कन्वी व गिरीश सव्वाशेर कांस्य पदक. पुरुष गट (9-10) फकीराप्पा कांस्य पदक. सदर टेबल टेनिसपटूंना जेबी स्पोर्ट्स फाउंडेशन बेळगावचे प्रशिक्षक संतोष जोशी आणि सहाय्यक प्रशिक्षक दिनेश भिराडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लागत आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *