Monday , December 8 2025
Breaking News

विद्याभारती जिल्हास्तरीय अथलेटिक स्पर्धेला प्रारंभ

Spread the love

 

अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/

——————————————————————–

——————————————————————–

बेळगाव : खेळ कोणताही असो व्यायाम हा केला पाहिजे. व्यायाम जीवनशैली बनली पाहिजे. ईश्वरांना दिलेली जन्मजात देणगी आहे. एखादे लहान बाळ सुद्धा हात पाय हलवल्यावर आपल्या आईचे दूध पचू शकते ते हात पाय हलवणे म्हणजेच व्यायाम आहे. व्यायाम म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने केलेली शरीराची हालचाल पण जसं जसं आपण मोठे होतो आमच्या सवयी बदलतात व नकळत व्यायामापासून दूर जातो, शालेय जीवनात अभ्यासाबरोबर व्यायामाला महत्त्व देणे गरजेचे आहे. शालेय प्रशिक्षकांचे मार्गदर्शनाखाली सराव केल्यास यश नक्की मिळते. यश प्राप्त झाले नाही तरी आपली प्रकृती सुदृढ राहू शकते यासाठी यशाला शॉर्टकट नाही. दिग्गज खेळाडूंचे फक्त यश न पाहता त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे अनुकरण ही करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मिस्टर इंडिया सुनील आपटेकर यांनी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी काढले.

नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा गणेशपुर हिंडलगा आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय अथलेटिक प्राथमिक मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून मिस्टर इंडिया एकलव्य पुरस्कार विजेते सुनील आपटेकर, बेळगांव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, सहसचिव सुजाता दप्तरदार, जनकल्याण ट्रस्टी अशोक शिंत्रे, संत मीरा गणेशपुर शाळेचे अध्यक्ष डॉ. विजय गोवेकर, सचिव देवीप्रसाद कुलकर्णी, मुख्याध्यापिका आरती पाटील, विद्याभारती जिल्हा अध्यक्ष माधव पुणेकर, उपाध्यक्ष रामनाथ नाईक, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, चिंतामणी ग्रामोउपाध्ये, श्वेता पाटील, आशा भुजबळ, श्रीकांत कांबळे उपस्थित होते.

प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते क्रीडाध्वजवंदन करण्यात आले. यानंतर दीप प्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले शालेय खेळाडू कृषी पावले, श्रेया राजूकर, तन्वी येळूरकर, अश्विनी पाटील, खंडू पाटील, प्रेम चौगुले प्रेम मोरारी, राजवर्धन भुजबळ यांनी मैदानाभोवती क्रीडा ज्योत फिरवून पाहुण्यांच्याकडे सुपूर्द केले. खेळाडू भूमी चौगुले हिने सहभागी खेळाडूंना शपथ देवविली. त्यानंतर अविनाश पोतदार यांनी खेळाडूंना सचिन तेंडुलकरचे उदाहरण देत एक चांगला खेळाडू निर्माण होण्यास प्रयत्न करावे असा सल्ला दिला. यानंतर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला याप्रसंगी आशा भुजबळ, तनुजा गावडा, माधवी हरेर, विद्या कम्मार, वैशाली कडेली, सही केरेकर, स्नेहा दळवी, जयश्री दळवी, रोहिणी पाटील, विद्या मगदूम, अनिता नाईक, मंजुनाथ भुजंगण्णावर, अमृता चिदगी, शिवकुमार सुतार, यश पाटील, अभिषेक गिरिगौडर, सिद्धांत वर्मा, ओमकार गावडे, प्रशांत वांडकर, गंगा, स्वाती सावंत, जयसिंग धनाजी, बापू देसाई, मॅथ्यू लोबो, हर्ष रेडेक उपस्थित होते. या स्पर्धेत संत मीरा अनगोळ, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, संत मीरा गणेशपुर हिडलगा, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर, गजाननराव भातकांडे स्कूल, देवेंद्र जिनगौडा स्कूल हनिवेल स्कूल खानापूर शाळेच्या संघानी भाग घेतला होता.

About Belgaum Varta

Check Also

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

Spread the love  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *