Wednesday , March 4 2026
Breaking News

एन. व्ही. बरमनी बेळगावात परतले! डीसीपी पदाचा कार्यभार…

Spread the love

 

बेळगाव : स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज करून खळबळ माजवलेले तसेच सर्वात जास्त काळ बेळगावमध्ये सेवा बजावलेले, सध्या धारवाड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस पदावर असलेले एन. व्ही. बरमनी यांना पुन्हा बेळगाव शहरातील मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. यासंदर्भात आदेश देखील शासनाने जाहीर केला आहे.

नुकताच बदली झालेल्या रोहन जगदीश यांच्या जागेवर बरमनी यांची बेळगाव शहराचे कायदा आणि व्यवस्था डीसीपी म्हणून त्यांची नियुक्ती करण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.

बेळगावात झालेल्या काँग्रेसच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी हात उभारल्यानंतर ते चर्चेत आले होते आणि झालेल्या वादा नंतर त्यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला होता त्यानंतर झालेल्या वादा नंतर त्यांची राज्य सरकारकडून मनधरणी करण्यात यशस्वी झाले.
यापूर्वीही एन व्ही बरमनी यांनी बेळगाव शहरात अनेकदा विविध ठिकाणी सेवा बजावली आहे. मार्केट पोलीस निरीक्षक मार्केट उपविभाग डीएसपी या अनेक पदावर त्यांनी बेळगावात काम केले होते आता त्यांची बेळगाव डीसीपी कायदा आणि सुव्यवस्था पदी नियुक्ती झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *