Monday , April 20 2026
Breaking News

बेळगाव- वेंगुर्ला रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्या : चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांची मागणी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव – वेंगुर्ला रस्ता संपूर्ण खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावर अनेक अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे नाहक बळी गेले आहेत. त्यामुळे या रस्त्याचा विकास करून राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची आवश्यकता असल्याची लक्षवेधी विधानसभेत मांडण्यात आली.

चंदगड-आजरा-गडहिंग्लजचे आमदार शिवाजी पाटील यांनी बुधवारी पावसाळी अधिवेशनात बेळगाव -वेंगुर्ला मार्ग राष्ट्रीय महामार्ग करावा यासंबंधी आज विधानसभेत लक्षवेधी मांडली.

आमदार पाटील यांनी विधानसभेत बोलताना कोल्हापूर जिल्ह्यातील माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातुन जाणारा बेळगांव-वेंगुर्ला मार्गावर गेल्या काही वर्षभरात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे दरवर्षी किमान ६० ते ७० निष्पाप लोकांचे नाहक बळी गेले आहेत. हा मार्ग वर्दळीचा असल्याने यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. या मार्गाचा विकास होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल. त्याचबरोबर याचा चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील या रस्त्यालगतच्या गावांना व्यावसायिक दृष्ट्या मोठा फायदा होईल.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

Spread the love  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *