Monday , September 21 2026
Breaking News

बैलूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव कुत्रा ठार!

Spread the love

 

खानापूर : तालुक्यातील बैलूर येथील शेतकऱ्याच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याची शिकार केल्याची घटना बुधवार दिनांक 16 जुलै रोजी घडली आहे.

बैलूर येथील शेतकरी नारायण कृष्णा कणकुंबकर त्यांचा मुलगा पुंडलिक कणकुंबकर हे गुरे चारण्यासाठी शेताकडे गेले होते. या शेताकडे जाण्यासाठी जंगलातून रस्ता जातो या रस्त्यावरून पुंडलिक व त्याच गावातील आणखीन एक शेतकरी मारुती विठोबा तारोळकर हे आपले गुरे चारविण्यासाठी जंगल वाटेने जात असताना बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून त्याला फरफटात नेले व मारून फस्त केले. दैव बलवत्तर म्हणून दोन्ही शेतकऱ्यांना या हल्ल्यात कोणतीही दुखापत झाली नाही परंतु या हल्ल्यात शेतकऱ्याच्या कुत्र्याचा बळी गेला. मागील वर्षी देखील पावसाळ्यामध्ये नारायण कृष्णा कणकुंबकर याच मार्गाने गुरे चारण्यासाठी शेताकडे जात असताना बिबट्याने सदर कुत्र्यावर हल्ला केला होता. मात्र सुदैवाने या हल्ल्यातून कुत्र्याचे प्राण वाचले होते शेतकऱ्यांनी आरडा ओरड करून त्या बिबट्याला त्या ठिकाणाहून हुसकावून लावले होते. मात्र एक वर्षानंतर पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती घडत कुत्र्याचा बळी गेला आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *